हवेली क्र. 24 मध्ये दस्त नोंदणी बंद

पिंपरी – नोंदणी महानिरिक्षक कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सहदुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. 24 अचानकपणे 13 ऑगस्टपासुन बंद करण्यात आले आहे. हे कार्यालय पुन्हा कधी सुरु होणार आहे, याची माहिती देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गोरखनाथ झोळ यांनी केले आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील मालमत्ता व जमीन खरेदीविक्रीचे दस्त नोंदविण्यासाठी शहराच्या विविध भागांत दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांना हे दस्त नोंदणीसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत.
मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता सहदुय्यम निबंधक कार्यालय-हवेली क्र. 24 हे 13 ऑगस्टपासून अचानकपणे बंद करण्यात आले आहे. ही बाब बेकायदेशीर आहे. कोणत्या कारणामुळे हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. आणि ते पुन्हा केव्हा सुरु होणार आहे, याची माहिती देण्याची मागणी या निवेदनात केली आहे.





