मनसैनिकांची हॉटेलचालकाला बेदम मारहाण; काय घडलं एकदा पाहाच…
Updated On:
कल्याण – कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिर चौक परिसरात एका हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल बोलताना त्यांना बेदम मारहाण करू, त्याच बरोबर काही अपशब्द वापरले होते.
ही चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच, मनसैनिकांनी संघटितपणे जाऊन त्या हॉटेल चालकाला जाब विचारून त्याला चोप दिला. पुन्हा असा काही प्रकार केला तर मनसे पध्दतीने धडा शिकवण्याचा इशारा दिला.
मनसे सैनिकांचा आक्रमकपणा पाहून हॉटेल चालकाने मराठी माणसाबद्दल पुन्हा असे काही वक्तव्य करणार नाही असे जाहीरपणे सांगून घडल्या प्रकाराबद्दल पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
कल्याण, डोंबिवलीत गेल्या वर्षभरात मराठी, अमराठी वादाचे सुमारे पाच ते सहा प्रसंग घडले आहेत. काही प्रकरणे तर न्यायालयापर्यंत पोहचली आहेत.





