Manoj Kumar : पंतप्रधान मोदींची मनोज कुमार यांना श्रद्धांजली; जुन्या आठवणींना दिला उजाळा, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले….

Manoj Kumar | Narendra Modi : चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत कुमार यांच्या निधनाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, मनोज कुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते, विशेषतः त्यांच्या देशभक्तीच्या भावनेसाठी ते लक्षात ठेवले जातात, जे त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होते.
मनोजजींच्या कार्यांनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहतील..’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहे. या आशाचे ट्विट मोदींनी केलं आहे.
Deeply saddened by the passing of legendary actor and filmmaker Shri Manoj Kumar Ji. He was an icon of Indian cinema, who was particularly remembered for his patriotic zeal, which was also reflected in his films. Manoj Ji’s works ignited a spirit of national pride and will… pic.twitter.com/f8pYqOxol3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025
खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट :
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार जी यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी सन १९५७ पासून अनेक चित्रपटांतून अभिनय केला. त्यांनी काही देशभक्तीपर चित्रपटांचीही निर्मिती केली होती.
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार जी यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी सन १९५७ पासून अनेक चित्रपटांतून अभिनय केला. त्यांनी काही देशभक्तीपर चित्रपटांचीही निर्मिती केली होती. हरियाली और रास्ता, शहिद, हिमालय की गोद में, पत्थर के सनम,… pic.twitter.com/w2cvAb23D2
— Supriya Sule (@supriya_sule) April 4, 2025
हरियाली और रास्ता, शहिद, हिमालय की गोद में, पत्थर के सनम, उपकार, पूरब और पश्चिम, शोर इ अनेक चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यांच्या निधनामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बुजुर्ग अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.
मनोज कुमार यांचे सर्वात लोकप्रिय चित्रपट :
है प्रीत जहाँ की रीत सदा… ही देशभक्तीपर गाणी आजही राष्ट्रीय सणांमध्ये ऐकली की अंगावर काटा येतो. जेव्हा देश ब्रिटीश राजवटीपासून नुकताच मुक्त झाला होता, तेव्हा मनोज कुमार यांचे चित्रपट आणि गाणी लोकांच्या मनात राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यात आणि ती जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होती.
देशातील भारत कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले मनोज कुमार यांनी पूर्वा और पश्चिम, उपकार, रोटी कपडा और मकान, क्रांती यांसारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले होते.
१९६५ मध्ये आलेल्या ‘शहीद’ चित्रपटात मनोज कुमार यांनी भगतसिंगांची भूमिका साकारली होती. त्यानंतर, १९६७ मध्ये, ते ‘उपकार’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता दोघेही होते. या चित्रपटात त्यांनी जय जवान जय किसान या घोषणेला आणखी बळकटी दिली.
मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. २०१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





