प्रसिद्ध कॉमेडियनला सोलपुरात मारहाण; वीर पहारियाने पोस्ट शेअर करत दिले स्पष्टीकरण…

Bollywood actor Veer Paharia | प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापूरमध्ये मारहाण करण्यात आली आहे. याबाबत प्रणितच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता वीर पहारियावर विनोद केला म्हणून त्याला ही मारहाण करण्यात आल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर वीर पहारियाने पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरात २ फेब्रुवारीला संध्याकाळी सोलापूरात शो संपल्यावर ११ ते १२ जणांनी प्रणितवर हल्ला केला. जमावातील एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पर जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली आहे. आम्ही पोलिसांकडेही मदतीसाठी संपर्क केला. त्यांनी मदतीसाठी येतो असं सांगितलं. पण कोणीही आले नाही, असे प्रणितच्या टीमकडून सांगण्यात आले. यावर आता वीर पहारियाने स्पष्टीकरण दिलं आहे. Bollywood actor Veer Paharia |
वीर पहारियाची पोस्ट
“कॉमेडियन प्रणित मोरेबरोबर जे काही घडलं, ते वाचून मला खरंच धक्का बसला आहे. सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायचीये ती म्हणजे, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही. उलटं मी हसतो आणि माझ्या टीकाकारांशी सुद्धा नेहमीच प्रेमाने वागतो. कधीही कोणाचं वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याचं समर्थन देखील करणार नाही”, असे वीर पहारियाने स्पष्ट सांगितले.
“माझ्यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचं तर मी अजिबातच समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण, कोणतीही व्यक्ती हे डिझर्व्ह करत नाही. या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन. पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो,” असेही वीर पहारियाने म्हंटले आहे.
वीर पहारियाने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.
हेही वाचा :
‘ChatGPT, DeepSeek चा वापर बंद करा’, केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना आदेश; ‘हे’ आहे कारण






