Manoj Jarange : “माझा उपोषण करून फेस पाडला आहे…” – मनोज जरांगे
मी देखील तीन वर्षे हाच शब्दांच्या खेळाने बेजार झालो आहे. माझा उपोषण करून फेस पाडला आहे. तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ यायला नाही पाहिजे.

Manoj Jarange – रोहित पवारांनी जीआरमधील शब्दांचा खेळ दाखवला. मी देखील तीन वर्षे हाच शब्दांच्या खेळाने बेजार झालो आहे. माझा उपोषण करून फेस पाडला आहे. तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ यायला नाही पाहिजे.
नरेंद्र मोदी शरद पवारांचा तांब्या भरून पाणी देतात. मोदीसाहेब एवढा जीव लावतात तर तुम्ही कशाला हाडके मोडून घेत आहे. शरद पवारांना एक फोन फिरवायला सांगा, शेतकऱ्यांचे कल्याण होईल.
माझे दुसरे प्रामाणिक मत आहे, सरकार तुम्हाला बोलवत असेल तर तुम्ही चर्चे करून मार्ग काढवा. सरकारने नाही ऐकले तर बघू. दत्तात्रय भरणेंनी तुमच्याशी चर्चा केली आहे. एकदा विश्वास ठेवून बघा, असा सल्ला मनोज जरांगे यांनी रोहित पवारांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार रोहित पवार हे सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस असून येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भेट दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आंदोलनाला प्रतिसाद आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतिडकीने आंदोलन केले तरी, लोक त्याला राजकारण म्हणणार आहेत. तुम्ही आमच्या पार्टीत या. आमच्या पार्टीत खूप मचाळा आहे.
तुमच्या पार्टीत थोड अवघड आहे. आमच्या पार्टीत गर्दी आणि मागण्या धडाधडा सुरू असतात. तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहिती नाही. हे आंदोलन कितीही अराजकीय म्हटले तरी किती जणांनी मान्य करायचं, येथेपर्यंत विषय आहे, असे ते म्हणाले.





