manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांची तोफ बारामतीत धडाडणार ! ‘या’ दिवशी होणार जाहीर सभा

manoj jarange patil – मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लाक्षणिक उपोषण करून मराठा आरक्षासाठी एल्गार पुकारणारे मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) हे शुक्रवारी (दि २०) बारामती (baramati) मध्ये येणार असून बारामती शहरातील तीन हत्ती चौक याठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. जरांगे पाटील (manoj jarange patil) यांची तोफ बारामतीत धडाडणार असून या सभेची जय्यत तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या गावी अंतरावली सराटी याठिकाणी आमरण उपोषण करून राज्य शासनाला घाम फोडला होता. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. नुकत्याच अंतरावली सराटी याठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.
मनोज जरांगे हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी जरांगे यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, आपण २४ ऑक्टोबर नंतर एक मिनिट देखील थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जरांगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकवटला आहे.
अंतरावली सराटी येथील सभेनंतर जरांगे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती शहरात तीन हत्ती चौक याठिकाणी दि २० ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता सभा होणार आहे. बारामती नगरपालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या चौकात ही जाहीर सभा होणार असल्याने सभेसाठी ही जागा तोकडी पडणार आहे.
बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्या राज्य सरकारला जरांगे यांनी अल्टिमेट दिला आहे. राज्यातील प्रभावी नेते असलेले अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद असून ते सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात होणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे.
दरम्यान याच दिवशी जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्या ठिकाणी तब्बल १०० एकर जागा या सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा राजगुरुनगरला होणार असली तरी जरांगे पाटील यांच्या बारामती येथील सभेची अधिक उत्सुकता आहे.
बारामती मध्ये होणाऱ्या सभेसाठी लगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातून मराठा समाज बांधव बांधव मोठ्या संख्येने येणार असून या सभेसाठी जागा कमी पडण्याची शक्यता आहे.





