Dr. Sanjay Lakhe Patil : मनोज जरांगेंना सरकारचा ड्राफ्ट आधीच माहिती होता; मराठा समन्वयकाचा गंभीर आरोप

Dr. Sanjay Lakhe Patil : मराठा समजाला आरक्षण मिळाले यासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनावर आणि त्यांनी केलेल्या मागणीवर मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॅा. संजय लाखे पाटील यांनी आक्षेप नोंदवित जरागेंवर सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय, अशा शब्दांत लाखे पाटील यांनी जरागेंना सुनावलं आहे.
तसेच शासनाने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहित होता, केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळला गेला. अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करून समाजाची फसवणूक केली असल्याचं लाखे पाटील म्हणाले आहेत. RSS च्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. ते समस्त मराठा समाजाचे नव्हे तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. जरांगेंची एकही मागणी वैद्य, कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही, असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे. त्यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही, असं देखील ते म्हणाले.
आरएसएसचा अजेंडा ते राबवत आहेत.
मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी चालवत आहेत. मुंबई आंदोलनादरम्यान जरांगे यांना शासनाने दिलेल्या ड्राफ्ट अगोदरच माहित होता. केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळला. मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीने मनोज जरांगे टार्गेट करत असून , मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा आरएसएसचा अजेंडा ते राबवत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा : ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका





