ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Lalit Prabhakar | मराठी अभिनेता ललित प्रभाकरला ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर तो काही मराठी चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाला. नुकताच तो ‘आरपार’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. यात तो अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत झळकला. यानंतर आता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. याआधी ललित इमरान हाश्मीच्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात झळकला होता.
यानंतर आता ललित ‘वन टू चा चा चा’ या हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक राज आणि रजनीश ठाकूर यांनी केली असून साजन गुप्ता, विजय लालवानी आणि नताशा सेठी यांनी निर्मिती केली आहे.
ललित प्रभाकरचा मराठी चित्रपट ‘आरपार’ 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ‘आरपार’ चित्रपटात ललित रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. तर ‘वन टू चा चा चा’ हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वन टू चा चा चा’ चित्रपटात बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर ललित प्रभाकर ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. हा चित्रपट 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. Lalit Prabhakar |
हेही वाचा:
Purna Ajji Replacement : ठरलं तर मग! मालिकेत पूर्णाआजी परतणार? या अभिनेत्रींच्या नावाची जोरदार चर्चा





