मनोज जरांगेंना मोठा दिलासा ! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द, सुनावणीत काय घडलं? वाचा

Manoj Jarange । मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकीलाने गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितले आहेत. गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे त्यांचं वारंट रद्द करावं. आमचा न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत, अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी न्यायालयाने दिली.
न्यायालयाचा आदेश रद्द करण्याबाबत विनंती Manoj Jarange ।
संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचे सांगितले आहे. तसे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे. या कारणास्तव न्यायालयाचा आदेश रद्द करण्याबाबत विनंती करण्यात आली. न्यायालयाचा आदेश असतानाही जरांगे पाटील न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने खटला प्रलंबित राहिला. हे प्रकरण 10 वर्ष जुने असून अशा जुन्या प्रकरणाचा त्वरित निपटारा होण्यासाठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे. वरिष्ठ कोर्टाचे त्यासंबंधीचे आदेश आहेत.
न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळावे Manoj Jarange ।
जरांगे यांनी समाजमाध्यमाद्वारे कोर्टाच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब समोर आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी करण्यापासून प्रत्येकाने टाळावे. त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाच्या अवमान कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, असेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत आरोपीने या न्यायालयाबाबत अथवा न्यायालयाच्या पिठासीन अधिकाऱ्यांबाबत वक्तव्य केली असल्याने कारवाई करण्याचा अधिकार या न्यायलायचा आहे. जरांगे पाटील यांनी यापुढे टिप्पणी करताना दक्षता बाळगावी अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.





