Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका ; जामीन देण्यास नकार

Manish Sisodia : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia)कथित दिल्ली मद्यधोरण भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा झटका दिला आहे. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या जामीन याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया(Manish Sisodia) यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत तपास सुरू असलेल्या प्रकरणांवर निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सीबीआय आणि ईडीला कथित दिल्ली उत्पादन शुल्क धोरण आणि सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावरील खटल्यांबाबत अनेक प्रश्न विचारले होते. सिसोदिया (Manish Sisodia) हे कथित दिल्ली मद्यधोरण भ्रष्टाचार प्रकरणी फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया( Manish Sisodia) यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. सिसोदिया यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात जामीन मागितला आहे. यापैकी एक गुन्हा सीबीआयने तर दुसरा गुन्हा ईडीने दाखल केला आहे.
दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावरील खटला ६ ते ८ महिन्यांत पूर्ण करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. खटल्याची प्रक्रिया संथ राहिल्यास सिसोदिया यांना तीन महिन्यांत पुन्हा जामिनासाठी याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल. अशा परिस्थितीत आता तीन महिन्यांनंतर सिसोदिया पुन्हा न्यायालयात पोहचणार का हे पाहावे लागणार आहे.





