Anjali Damania : माणिकराव कोकाटे जी, तुमचे त त प प,….; अंजली दमानियांनी कृषीमंत्र्यांच्या त्या विधानावरून लगावला टोला

Anjali Damania : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांंचा सभागृहात रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. विरोधकांनी तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे आज कोकाटे पत्रकार परिषदेतून राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरू होती. या उलट कोकाटेंनी छोटा विषय ठरवत या प्रकरणी सारवासारव केली. व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर त्यांनी आपली भूमिका मांडत रम्मी खेळायलाच येत नाही, असे म्हटले आहे.
पत्रकार परिषेदेतून आपली बाजू मांडताना विरोधकांवर राजकीय हेतूने बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. अशातच आता त्यांच्या पत्रकारपरिषदेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
माणिकराव कोकाटे जी, तुमचे त त प प, तुमच्या पत्रकार परिषदेत, आम्ही पाहात आहोत…. अचानक पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांचा पुळका ? असा सवा दमानिया यांनी केला आहे. तसेच ओसाड गावच्या पाटीलाचा राजीनामा मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांचे ट्वीट
माणिकराव कोकाटे जी, तुमचे त त प प, तुमच्या पत्रकार परिषदेत, आम्ही पाहात आहोत….
अचानक पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांचा पुळका ?
शेतकऱ्यांना संवेदनशील कृषी मंत्री हवे आहेत. त्यांच्यावर कृपा करा आणि तुमचा राजीनामा द्या.
ओसाड गावच्या पाटीलाचा राजीनामा मिळालाच पाहिजे pic.twitter.com/qo9SUYRbUD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 22, 2025
माणिकराव कोकाटे जी, तुमचे त त प प, तुमच्या पत्रकार परिषदेत, आम्ही पाहात आहोत…. अचानक पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांचा पुळका ? शेतकऱ्यांना संवेदनशील कृषी मंत्री हवे आहेत. त्यांच्यावर कृपा करा आणि तुमचा राजीनामा द्या. ओसाड गावच्या पाटीलाचा राजीनामा मिळालाच पाहिजे, असे ट्वीटमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे.
कोकाटेंचे स्पष्टीकरण
“सदन स्थगित असताना मी यूट्यूबवर विधानसभेचे कामकाज पाहत होतो. माझ्या ओएसडीकडून माहिती घेण्यासाठी मी दुसरा मोबाइल मागवला होता. त्या मोबाइलवर डाउनलोड असलेला गेम अचानक उघडला, आणि तो 5-10 सेकंदात मी बंद केला. ऑनलाइन रम्मी खेळण्यासाठी मोबाइल नंबर आणि बँक खाते जोडावे लागते, पण माझे कोणतेही खाते त्याच्याशी जोडलेले नाही. गेल्या पाच वर्षांत मी एक रुपयाचीही रम्मी खेळलेली नाही.” असे स्पष्टीकरण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे.
खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार
हा माझी बदनामी करण्याचा डाव आहे. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांना मी कोर्टात खेचणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच माझी प्रतिमा खराब करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न झाला आहे. याची सखोल चौकशी व्हावी, आणि दोषींचे सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) तपासावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
हेही वाचा : “राजीनामा देण्यासारखं घडलं काय? माझी पार्श्वभूमी काय गुन्हेगारी…”; कोकाटेंनी थेट केले हात वर





