“राजीनामा देण्यासारखं घडलं काय? माझी पार्श्वभूमी काय गुन्हेगारी…”; कोकाटेंनी थेट केले हात वर

Manikrao Kokate | कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला. त्यांनतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येऊ लागली. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने देखील जोर धरला होता. त्यामुळे त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या पत्रकार परिषदेत कोकाटे राजीनामा देतील का? याबद्दल तर्क व्यक्त केले जात होते. मात्र कोकाटे यांनी राजीनामा दिलेला नाही. कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘मी काय कोणाचा विनयभंग केला आहे, मी चोरी केलेली आहे का?’
“मी राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केला आहे, मी चोरी केलेली आहे का माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? एक फोटो फक्त आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय विरोधकांनी मी त्यांना कोर्टात खेचणार आहे, अब्रुनुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन,” असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. Manikrao Kokate |
‘हा इतका छोटा विषय आहे’
“खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे. हा विषय इतका का वाढला हे समजत नाही. जंगली रमी हा विषय तुम्हाला माहित नाही का? असा गेम खेळताना तुम्हाला तुमचा फोन नंबर व बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करावी लागते. हा गेम आल्यापासून ते आतापर्यंतची माहिती तुम्ही तपासा. माझा नंबर किंवा बँक खातं अशा गेमशी संलग्न आहे का ते तपासा. मी प्रसारमाध्यमांना माझा फोन व बँक खाते क्रमांक देतो. तुम्ही चौकशी करा,” असे कोकाटे यांनी म्हंटले आहे.
“मला रमी खेळता येत नाही. हे सर्व आरोप खोटे आहेत, ज्यामुळे माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे,” असा इशारा आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला आहे. Manikrao Kokate |
दरम्यान, कोकाटे हे सभागृहात रमीच्या माध्यमातून ऑनलाइन जुगार खेळत होते, असा आरोप विरोधकांनी केला. मात्र यावर आता कोकाटे यांनी हा विषय खूप छोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची मागणी केली तर राजीनामा देईन असे पत्रकार परिषदेत सांगितले. Manikrao Kokate |
हेही वाचा :





