माणदेशी : शेळीपालनातून संगीता हजारे यांनी कष्टपूर्वक मिळविले आर्थिक स्थैर्य

शेतीला जोडधंदा म्हणून गाय आणि शेळीपालन करणाऱ्या संगीता हजारे यांनी मेहनतीने आर्थिक स्थैर्य मिळविले. एका शेळीवर सुरू झालेला व्यवसाय त्यांनी 30 शेळ्यांपर्यंत पोहचवला. दुधाची विक्री म्हणजे रोज पैसे पण शेळीपालनाचा व्यवसाय म्हणजे फिक्स डिपॉझिटसारखा आहे, एकदम पैसे मिळवून देणारा आहे, असे त्या आत्मविश्वासाने सांगत होत्या. माणदेशी फाउंडेशनचे मार्गदर्शन लाभल्यामुळे काही प्रशिक्षणातून त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी दिशा मिळाली आणि त्या आत्मनिर्भर बनल्या सांगोला तालुक्यातील आलेगाव.
तसा हा पट्टा दुष्काळीच. शेतीला जोडधंदा आवश्यकच. अशा स्थितीत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हातपाय हलवले पाहिजेत, या जिद्दीने संगीता हजारे यांनी शेळी आणि गाय पाळायचे ठरविले. तीन वर्षांपूर्वी एक शेळी घेतली. त्यावेळी आपला हाच व्यवसाय मोठा होईल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. एका शेळीच्या दहा शेळ्या कधी झाल्या ते त्यांच्या लक्षातही आले नाही. दूध विक्री तर होतीच. पण त्यापेक्षा शेळ्या आणि बोकडांना मागणी होती. मागणीनुसार पुरवठा करायला आणखी काही तरी
करायला पाहिजे, कुठून तरी कर्ज घेतले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात डोकावत होता.
नेमके त्याचवेळी माणदेशीच्या गोट डॉक्टर म्हणून काम पाहणाऱ्या पटेल यांची त्यांची भेट झाली. संगीताताईंकडेअसणाऱ्या शेळ्या पाहून हा व्यवसाय आणखी वाढविणासाठी त्यांनी आवश्यक माहिती दिली. शेळ्यांचे लसीकरण करून दिले. शेळीपालनाबाबत माणदेशीकडून सुरू असणाऱ्या उपक्रमांचीही माहिती त्यांनी दिली. त्यावेळी या व्यवसायाला अधिक प्राधान्य देण्याचे त्यांनी ठरविले. शेळीपालन व्यवसाय वाढविण्यासाठी माणदेशीकडून कर्ज मिळाले. शेळ्यांसाठीचे शेड व्यवस्थित वाढविले.
या शेळ्या घेताना त्यांचा विमाही उतरवला होता. पुढे लगेचच पावसाळ्यात दोन शेळ्या व्यायल्या. पण शेळ्या मरण पावल्या. विमा असल्यामुळे त्याचे पैसेही मिळाले. खरं तरं शेळ्यांबरोबरच 8- 9 गायीही त्यांच्याकडे होत्या. पण तुलनेने शेळीपालनाला खर्च कमी येतो. चारा कमी लागतो. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. झाली तर दुधाची विक्री नाही तर बोकडांचे प्रमाण जास्त मिळते.
बोकडांच्या विक्रीमुळे एकाच लॉटमध्ये 60- 70 हजार मिळून जातात. वर्षभरात दीड ते पाऊण लाखांची विक्री होते. हे लक्षात घऊन शेळीपालनालाच महत्त्व देण्याचे त्यांनी ठरविले. शेळ्या किंवा बोकड विकून दहा हजारपेक्षा जास्त पैसे मिळतात. शेतकऱ्याच्या उत्पन्नाला चांगला दर मिळत नसतो. पण सध्या मटणाला दर चांगला मिळत असल्याने शेळीपालनाचा जोडव्यवसाय त्यांना किफायतशीर वाटू लागला. तीन करडाच्या शेळीला, भरपूर दूध देणाऱ्या धष्टपुष्ट स्थानिक शेळीला चांगली मागणी असते. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे या काळात दूध थोडे कमीच मिळते. त्याशिवाय वाढलेल्या तापमानाचा परिणामशेळ्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यांच्या आजारपणासाठीखर्च वाढतो. ऋतू बदलताना शेळ्यांना लसीकरण करावेलागते. कारण त्यावेळी त्यांना लाळखुरकत, बुळकांडीयासारखे आजार होतात. उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना
आणि पावसाळ्यातून हिवाळ्यात जाताना हे लसीकरण करावेलागते. मुळात शेळीपालन व्यवसाय इतका किफायतशीरअसतो, हे लक्षात येत नाही. त्यातही एखादी महिला असाव्यवसाय करू शकेल, ही कल्पनाही येत नाही.
अशा वेळीसंगीता हजारेमोठ्या मेहनतीनेहा व्यवसायपुढे नेत आहेत.त्यासाठी सकाळीलवकर उठूनशेळ्यांनी मकाकिंवा ज्वारी,ओली वैरण असेखाद्य देणे, पाणीपाजणे, मुरघासतयार करून त्यांना खायला देणे, चरायला सोडणे अशा गोष्टी रोजच्या रोज क्रमाक्रमाने कराव्या लागतात. त्यासाठी कष्ट आहेत.
कष्ट असले तरी त्यासाठी ठराविक वेळेचे नियोजन केले तर शेतीतील किंवा इतर कामांसाठीही वेळ मिळू शकतो, हा या व्यवसायाचा आणखी एक फायदा आहे. शेळीपालनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण माणदेशीकडून मिळाल्यामुळे शेळ्यांची निगा राखण्यासाठी त्यांना मदत होते. एकूण उत्पन्नात शेळीपालनातून 25 टक्के खर्च जाऊन पैसे मिळतात. तेच गायपालनासाठी 60 टक्के खर्च होत असतो. त्यामुळे रोजच्या दुधाचे पैसे मिळतात. पण त्यामागे अधिक कष्ट अधिक खर्च आहे.
शेळीपालनात तुलनेत कमी कष्टात अधिक फायदा असे समीकरण अनुभवता येते. ग्रामीण भागातील एखादी महिला अशा पद्धतीने तुलनात्मक विचार करून आपल्या व्यवसायाला दिशा देते, हे खूप महत्त्वाचे आणि अनुकरणीय आहे. शेळी ही शेतकरी महिलांचे एटीएम आहे. त्या महिलेला ज्यावेळी मुलामुलींच्या शिक्षणासाठी किंवा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी पैशांची गरज भासते, त्यावेळी तिच्याकडे शेळी असेल तर ती बाजारात जाऊन खरेदी विक्रीही करू शकते. शेळीपासून मिळणारे उत्पन्न नियंत्रणात ठेवू शकते. तिला मिळालेले पैसे कुठे खर्च करायचे याचा निर्णय ती घेऊ शकते. पण कोणताही मापदंड तयार करताना जिद्द, कष्ट, मेहनत आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते, हे संगीता हजारे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.





