Pune Metro : दहीहंडीनिमित्त मंडई मेट्रो स्थानकावरील प्रवेशमार्गांवर तात्पुरता बदल
Pune Metro : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडई मेट्रो स्थानकातील प्रवेशमार्गांमध्ये ५ सप्टेंबरला तात्पुरता बदल करण्यात आला आहे. गेट क्रमांक ३ प्रवेशासाठी, तर गेट क्रमांक २ बाहेर पडण्यासाठी खुले राहणार.

Pune Metro : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांची सोय आणि स्थानकातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावरील प्रवेशमार्गांवर तात्पुरता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. ५) सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंडई मेट्रो स्थानकातील प्रवेश दरवाज्यांवरील व्यवस्था बदलली आहे. त्यानुसार गेट क्रमांक ३ (लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील) केवळ प्रवेशासाठी खुले राहणार आहे.
तर गेट क्रमांक २ (महात्मा फुले मंडईच्या मागे, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर) केवळ बाहेर पडण्यासाठी खुले राहणार आहे. रविवारपासून (दि. ६) स्थानकातील सर्व प्रवेशमार्ग नेहमीप्रमाणे नियमित सुरू राहतील. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलाची नोंद घेऊन गर्दीचे नियोजन करण्यासाठी मेट्रो प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो व्यवस्थापनाने केले आहे.





