Manchar Election: मंचरमध्ये ‘रिक्षा’ सुसाट! ऑटो रॅलीने बदलले निवडणुकीचे वारे; विरोधकांसमोर मोठे आव्हान

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंचर शहरात भावी नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यात मुख्यत्वे करून अपक्ष उमेदवार प्राचीताई आकाश थोरात यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात असून याच नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
मंचर नगरपंचायत निवडणूक पहिल्यांदाच होत असल्याने नगराध्यक्ष पदावर आपला उमेदवार कसा निवडून येईल. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ताकद लावली आहे; मात्र यात अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांचे पारडे जड असल्याची चर्चा मंचर शहरात आहे. मंचर येथील जनसेवक संजय थोरात यांनी गेली सात ते आठ वर्षे केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्या स्नुषा प्राचीताई थोरात यांना विजय सुखकर होईल असे बोलले जात आहे.
थोरात यांच्या प्रचारार्थ काढलेल्या प्रचार रॅलीत शेकडो ऑटो रिक्षा सहभागी होऊन मंचर परिसर दणाणून गेला. त्यानंतर जाहीर सभेत देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली. एकंदरीत अपक्ष उमेदवार प्राचीताई आकाश थोरात यांचे चिन्ह असलेले ऑटो रिक्षा चिन्हाची चर्चा विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी घेतली असून सुसाट निघालेल्या ऑटो रिक्षाला थांबवायचे कसे, असा प्रश्न विरोधी पक्षातील उमेदवारांना पडला आहे.





