चर्चा तर होणार…! ‘ममता बॅनर्जी यांनी 9 किमी पायी चालत केला रोड शो’

Lok Sabha elections 2024 । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दम दम आणि कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दोन रोड शो केले. आपल्या दोन्ही रोड शोमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुमारे 9 किलोमीटरचे अंतर पायी कापले.
समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या रोड शोमध्ये, टीएमसी सुप्रीमो पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह जेसोर रोडवरील विमानतळाच्या गेट क्रमांक दोनपर्यंत बिराटी बनिक वळणापासून सुमारे चार किलोमीटर चालले. दमदम लोकसभा मतदारसंघातील दिग्गज टीएमसी नेते आणि सलग चौथ्यांदा या जागेवरून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार सौगता रॉय यांच्या समर्थनार्थ रोड शो आयोजित करण्यात आला होता.
सौगता रॉय व्यतिरिक्त, टीएमसी मंत्री सुजित बोस आणि चंद्रिमा भट्टाचार्य रोड शोमध्ये सहभागी झाले होते, तर दक्षिण कोलकाता येथे, शहराचे महापौर आणि मंत्री फिरहाद हकीम ममता यांच्याशी ताळमेळ घालताना दिसले. कोलकाता दक्षिणेत सुदीप बंदोपाध्याय यांच्यासाठी प्रचार केला.
दुसऱ्या रोड शोमध्ये ममता दक्षिण कोलकाता येथील एन्टले मार्केट ते बल्लीगंगे फरीपर्यंत सुमारे पाच किलोमीटर चालल्या. एका दिवसात एकूण नऊ किलोमीटर चालल्या आहे. कोलकाता दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेल्या कोलकाता दक्षिणच्या उमेदवार माला रॉय यांच्या समर्थनार्थ ममता यांनी हा रोड शो केला. ममता यांनी कोलकाता उत्तर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार सुदीप बंदोपाध्याय यांच्या समर्थनार्थ प्रचारही केला. सुदीप तिसऱ्यांदा कोलकाता उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या,’मी बुधवारी पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला भेट देणार आहे. माझे जाण्याचे आधीच ठरले होते. मी स्वामीजींच्या घरी जाईन. आम्हीच सरकारकडून घर घेतले होते, ते माफियांनी हडप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्या म्हणाल्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस तुम्ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित कराल, असे तुम्हाला वाटत नाही का? आणि तुम्ही निवडणुकीच्या वेळी येऊन त्यांना पुष्पहार घालता? नेताजींनी भारतीय लष्कर आणि नियोजन आयोगाची निर्मिती केली.. आणि नियोजन आयोग कोणी विसर्जित केला?
मोदीजी..! मी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे.. अटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते.. मी मनमोहन सिंग, राजीव जी, नरसिंह राव.. देवेगौडा यांच्यासोबत काम केले आहे.. त्यांच्यासारखा पंतप्रधान मी पाहिला नाही.. देशाला तुमच्या सारखा पंतप्रधान नाही पाहिजे.’ असं म्हणत ममता यांनी मोदींवर टीका केली.





