BJP News : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; बार कौन्सिल निवडणुकीत TMC चे एकहाती वर्चस्व
पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींमध्ये आता एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट (BJP News) पाहायला मिळत आहे.

BJP News : पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींमध्ये आता एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट (BJP News) पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत बंडखोरी, कायदेशीर पेच आणि विरोधकांच्या आक्रमक राजकीय हल्ल्यांमुळे सातत्याने अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे.
पश्चिम बंगाल बार कौन्सिल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) दणदणीत विजय मिळवत २३ पैकी १५ जागांवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. हा निकाल केवळ एक विजय नसून, विरोधी पक्षांची (BJP News) धडधड वाढवणारा ठरला आहे.
राज्यात भाजपची (BJP News) ताकद वाढलेली असतानाही वकिलांच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपला केवळ तीन जागांवरच समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या समीकरणांना पूर्णपणे छेद देणाऱ्या या निकालाने कायदेतज्ज्ञ आणि बौद्धिक वर्गात ममता बॅनर्जी यांचा प्रभाव आजही कायम असल्याचे अधोरेखित केले आहे.
तृणमूलच्या बहुतांश विजयी उमेदवारांची निवड स्वतः ममता बॅनर्जी यांच्या शिफारशीनुसार झाली होती. ज्यामुळे त्यांचा राजकीय करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या गोटात (BJP News) प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तृणमूलच्या लीगल विंगचे सुभाषिस चक्रवर्ती यांनी सर्वाधिक मतांच्या फरकाने विक्रमी विजय मिळवला. त्यांच्यासोबतच बैसानोर चॅटर्जी, अन्सार मंडल, अशोक देब, इंद्रनील बसू आणि सिद्धार्थ मुखर्जी यांसारख्या प्रमुख उमेदवारांनी बाजी मारली.
एकूण ७५ उमेदवार रिंगणात असलेल्या या चुरशीच्या लढतीत तृणमूलचे २३, भाजपचे २२, डाव्या पक्षांचे १२ आणि १८ अपक्ष उमेदवार मैदानात उतरले होते. या निकालात भाजपने आपल्या जुन्या तीन जागा कशाबशा राखल्या, तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या.
दुसरीकडे डाव्या आघाडीची घसरण कायम राहिली असून त्यांचे संख्याबळ चारवरून तीनवर घसरले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून दोन महिला सदस्यांची अतिरिक्त नियुक्ती केली जाणार असून, त्यानंतर पश्चिम बंगाल बार कौन्सिलची एकूण सदस्यसंख्या २५ होणार आहे.






