West Bengal railway accident: पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात! स्कूल व्हॅनला ट्रेनची धडक
West Bengal railway accident: पश्चिम बंगालमधील बहरामपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे.

West Bengal railway accident: पश्चिम बंगालमधील बहरामपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी मुलांना शाळेत घेऊन जाणारी व्हॅन रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनला धडकली. या अपघातात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे.
बहरामपूरच्या गोविंदपूर भागात हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंग उघडे होते, त्यामुळे हा अपघात झाला. या घटनेत दोन मुलांसह एकूण ३ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे क्रॉसिंगवर तैनात असलेल्या गेटमनला तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
या अपघातात जखमी झालेल्या मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुकांता मजुमदार म्हणाल्या – रेल्वे स्वतंत्रपणे चौकशी करेल
केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी बहरामपूर येथील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, कोणाचाही जीव जाणे दु:खद आहे, पण मुलांचा मृत्यू त्याहूनही हृदयद्रावक आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, या घटनेची चौकशी आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की रेल्वे स्वतंत्रपणे तपास करेल.
#WATCH | West Bengal | A number of students were injured after a vehicle carrying school students was hit by a train at a railway level crossing at Karnasuvarna in Murshidabad’s Berhampore
Visuals from the accident site pic.twitter.com/wpzdL7Zqlf
— ANI (@ANI) July 17, 2026
रेल्वे अधिकाऱ्याने काय सांगितले?
पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, कर्ण सुबर्णा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगवर सकाळी ७ वाजता हा अपघात झाला. त्यांनी सांगितले, ‘शाळकरी मुलांना घेऊन जाणारी कार काटव्यापासून सुमारे 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्ण सुबर्णा स्टेशनजवळ लेव्हल क्रॉसिंगवर रेल्वे रुळ ओलांडत होती, तेव्हा एका लोकल ट्रेनने गाडीला धडक दिली.’
#WATCH | West Bengal | Injured school students rushed to a local hospital after a vehicle carrying them was hit by a train at a railway level crossing at Karnasuvarna in Murshidabad’s Berhampore pic.twitter.com/cKEfn5Dvr3
— ANI (@ANI) July 17, 2026
अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी 10 सदस्यीय पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी लेव्हल क्रॉसिंगचे गेट उघडे असल्याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर पूर्व रेल्वेच्या हावडा विभागातील अझीमगंज-कातवा सेक्शनमध्ये रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.





