Mamata Banerjee : ममता दीदींचा खेळ संपला, बंगालमध्ये परिवर्तन होणार; भाजप नेत्यांचा दावा
पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र दिसून आलेल्या प्रचंड मतदार उत्साहाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी (Mamata Banerjee) बुधवारी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते हे राज्यातील परिवर्तनासाठी एक शुभसंकेत आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगाल मध्ये सर्वत्र दिसून आलेल्या प्रचंड मतदार उत्साहाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी (Mamata Banerjee) बुधवारी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते हे राज्यातील परिवर्तनासाठी एक शुभसंकेत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सामिक भट्टाचार्य, केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर, ज्येष्ठ नेते दिलीप घोष आणि अभिनेते-राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी असेच विचार (Mamata Banerjee) व्यक्त केले. लोकांनी कोणत्याही भीतीशिवाय किंवा धाकधमकीशिवाय आपल्या लोकशाही हक्कांचा वापर केला, असे ते म्हणाले.
खरगपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या घोष यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील (Mamata Banerjee) परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट झाल्यामुळे केंद्रीय दलांची उपस्थिती आवश्यक होती. पूर्वी तृणमूलचे गुंड विरोधी उमेदवारांवर हल्ला करायचे आणि मतदारांना धमकावायचे, पण आता ते तसे करू शकत नाहीत.
आता सर्वत्र हिंसाचारमुक्त आणि भीतीमुक्त वातावरण आहे आणि याचे श्रेय निवडणूक आयोगाला जाते. राज्यातील जनता आता परिवर्तनासाठी आणि टीएमसी सरकार हटवण्यासाठी आतुर आहे. बेलगाछिया येथे मतदान (Mamata Banerjee) करणारे अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, त्यांनी कोणत्याही विशेष सुविधा न मागता रांगेत उभे राहून एका सामान्य मतदाराप्रमाणे मतदान केले. मला कोणतीही सुविधा नको आहे.
कोटेशन
५० वर्षांनंतर पश्चिम बंगालच्या जनतेने अशा प्रकारे मतदान केले आहे. जिथे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून मतदान केंद्राबाहेर मतदारांना धमकावण्याचे आणि घाबरवण्याचे नेहमीचे दृश्य नव्हते. प्रत्येकजण आपले मत देण्यासाठी पुढे आला आहे. तुम्हाला ज्याला मत द्यायचे आहे, त्याचा मुक्तपणे मतदानाचा हक्क बजावा. केंद्रीय दल आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खोटे दावे आता चालणार नाहीत, हे राज्यभरातील पहिल्या आणि सध्याच्या दुसऱ्या टप्प्यातील उच्च मतदान टक्केवारीवरून दिसून येते.
– सामिक भट्टाचार्य, राज्यसभा भाजपा खासदार






