कोलकाता – शुक्रवारी हावडा स्टेशनवर प्रचंड नाट्य घडले. आज या स्टेशनवरील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
त्यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्यास मुख्यमंत्री ममतांनी नकार दिला. त्या प्रेक्षकात बसल्या होत्या. रेल्वे स्थानकावर निमंत्रित जमावाच्या एका भागातून जोरदार घोषणाबाजी झाल्यानेही त्या अस्वस्थ दिसल्या.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी त्यांना समजावण्यासाठी केलेले प्रयत्न फळाला आले नाहीत, कारण मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठा ऐवजी प्रेक्षकांसह खुर्चीवर बसणे पसंत केले.
परीक्षा, निकाल व प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध नियोजन – मंत्री चंद्रकांत पाटील
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेला फार महत्व देणे टाळले. ते म्हणाले की कार्यकर्ते घोषणाबाजी करीत असतात. त्यामुळे कोणी नाराज होण्याचे कारण नाही. ममतांना आम्ही सन्मानाने आमंत्रित केले होते असे त्यांनी सांगितले.