Asha Bhosle Passes Away : “त्यांच्यासोबत घालवलेले क्षण मी नेहमीच जपून ठेवीन” ; पंतप्रधानांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली
Asha Bhosle Passes Away : दिग्गज गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे.

Asha Bhosle Passes Away : दिग्गज गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्व्या वर्षी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आशा भोसले यांच्यावर सोमवारी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. सकाळी ११ वाजता त्यांच्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर गायिका आशा भोसले यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे, “आशा भोसलेजींच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्या भारतातील सर्वात आदरणीय आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक होत्या.
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण… pic.twitter.com/JsjoxbdCCt
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026
अनेक दशके चाललेल्या त्यांच्या विलक्षण संगीत प्रवासाने आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. मग ती त्यांची भावपूर्ण गाणी असोत किंवा चैतन्यमय रचना, त्यांच्या आवाजात नेहमीच एक कालातीत तेज होते. Asha Bhosle Passes Away :
त्यांच्यासोबत घालवलेले क्षण मी नेहमीच जपून ठेवीन. त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम गुंजत राहतील.”
त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. देशभरातील अनेक कलाकारांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती दर्शवली आहे.





