नव्या सभापतींना खरगेंचा सल्ला ; म्हणाले,”तिकडे पाहू नका , तिकडे धोका…”

Mallikarjun Kharge। संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. ते सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरू झाले आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचे खास पद्धतीने स्वागत केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांना संबोधित केले. अधिवेशनादरम्यान खरगे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी अध्यक्ष राधाकृष्णन यांना एक खास सल्लाही दिला.
सत्ताधारी पक्षाचा उल्लेख करताना खरगे यांनी अध्यक्ष राधाकृष्णन यांना सांगितले की, “मला आशा आहे की तुम्ही दोन्ही बाजूंना समान विचार द्याल. तुम्ही दोन्ही बाजूंना समान लक्ष द्याल. जर तुम्ही तुमच्या जागेवरून तिकडे जास्त पाहिले नाही तर धोका आहे आणि जर तुम्ही इकडे पाहिले नाही तरी देखील धोका आहे. म्हणून, दोन्ही बाजूंनी संतुलन राखले तर ते चांगले होईल.” “तुम्हाला यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.”असे त्यांनी म्हटले.
खरगेंनी धनखर यांच्याविषयी काय म्हटले ? Mallikarjun Kharge।
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा उल्लेख करत खरगेंनी, “माजी अध्यक्षांना निरोप देण्याची संधी मिळाली नाही याचे मला खूप दुःख आहे, परंतु आम्हाला आशा आहे की आमच्या माजी अध्यक्षांचेआरोग्य चांगले ठेवतील .” खरगेंच्या उत्तरानंतर भाजपने निषेध केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “खर्गेजींनी जे काही सांगितले, पण ते योग्य नव्हते.”
काँग्रेस अध्यक्षांनी मोदींना दिले प्रत्युत्तर Mallikarjun Kharge।
खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी संसदेसमोरील मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पुन्हा एकदा “‘ड्रामेबाजी’ केली. असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता त्यांचे विचलित करणारे डावपेच थांबवावेत आणि संसदेत लोकांच्या खऱ्या मुद्द्यांवर चर्चा करावी” असे आवाहन देखील केले आहे.
विरोधकांना लक्ष्य करत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या निराशेला बाहेर काढण्यासाठी संसदेचा वापर करण्याचा आरोप केला. पंतप्रधान म्हणाले की हे अधिवेशन राजकीय रंगमंच बनू नये, तर रचनात्मक आणि परिणामाभिमुख चर्चाकरावी असे म्हटले होते.





