Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी; 10.89 लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण!
माळेगाव कारखान्याने (Malegaon Sugar Factory) सन २०२५- २०२६ या हंगामात १२ लाख मे. टनाचे वर ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवलेले होते, परंतु महाराष्ट्रामध्ये या वर्षी झालेल्या जादा पावसामुळे ऊसाचे प्रती एकरी उत्पादनामध्ये सर्वत्र घट झालेचे दिसुन येत आहे.

Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्याने (Malegaon Sugar Factory) सन २०२५- २०२६ या हंगामात १२ लाख मे. टनाचे वर ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवलेले होते, परंतु महाराष्ट्रामध्ये या वर्षी झालेल्या जादा पावसामुळे ऊसाचे प्रती एकरी उत्पादनामध्ये सर्वत्र घट झालेचे दिसुन येत आहे.
घटलेल्या ऊस उत्पादनामुळे आपले कारखान्याचे गाळपावर देखील त्याचा परिणाम झालेला दिसुन येत आहे. कारखान्याचे दिवंगत चेअरमन अजित पवार यांनी दिनांक ५ जुलै रोजी कारखान्याचे चेअरमन म्हणुन कार्यभार स्विकारला. अजित दादांचे मार्गदर्शक सुचना व निर्देशानुसार कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ यशस्विरीत्या सुरु झाला.
माळेगांव कारखान्याने दिनाक ०६.०३.२०२६ अखेर १०,८९,६८३.८५४ मे.टन ऊस गाळपाचा टप्पा १२५ दिवस या अल्पावधीमध्ये पुर्ण केला असुन बी हेवी डायव्हर्जन सह सरासरी १२.२८३ या रिकव्हरीने १२,७७,१०० क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन घेतले आहे. तसेच चालु हंगामामध्ये कारखान्याने ८,८९,७७,३०० युनिटची वीज निर्मिती केलेली आहे.
यापैकी अंतर्गत वापर ३,६७,७८,७४० युनिट होऊन ५,२१,९८,५६० युनिट इतकी वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निर्यात केलेली आहे. कारखान्याचे डिस्टीलरी विभागामध्ये चालु हंगामात स्पिरीट (बी हेव्ही व सी हेव्ही) ९३,८१,४१६ लिटर्स व इथेनॉल (बी हेव्ही व सी हेव्ही) ७६,२३,७८० लिटर्स उत्पादन घेतलेले आहे.
कारखान्याने सभासदांचे ७,२०,१८९.८८७ मे.टन, कार्यक्षेत्रातील बिगर सभासदांचे १३,९९४.७०० मे.टन व गेटकेन ऊस पुरवठादारकांचे ३,५५,४९९.२६७ मे.टन अशा गळीत हंगाम २०२५-२६ करीता गाळपास आलेल्या ऊसाचे एफ.आर.पी. पेक्षा जास्त पेमेंट ऊस पुरवठादारांना वर्ग केले.
गळीत हंगाम २०२५-२६ करीता माळेगांव कारखान्याची एफ.आर.पी. रुपये ३२७०/-प्र.मे.टन प्रमाणे येत असुन कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा जास्त म्हणजे रुपये ३३००/-प्र.मे.टन प्रमाणे सर्व पेमेंट ऊस पुरवठाधारकांना अदा केले आहे. तसेच दि.०५.०२.२०२६ नंतर गाळपास आलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन ऊसास रु.१००/- अधिकचे (रुपये ३४००/- प्र.मे.टन) प्रमाणे पेमेंट अदा केले आहे.
कारखान्याच्या विद्यमान चेअरमन तथा उपमुख्यमंत्री,सुनेत्रा पवार, व्हाईस चेअरमन संगिता कोकरे व संचालक मंडळ या सर्वांचे मार्गदर्शनाखाली तसेच कारखाना सभासद, कारखाना अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतुकदार, तोडणी मजुर यांचे सहकार्याने कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीतपणे पार पडला असल्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले.






