माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ॲड. केशवराव जगताप यांची निवड
Updated On:

बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ॲड.केशवराव जगताप तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांना संधी मिळाली. शनिवार (दि.२३) कारखाना संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी सांगितले.
बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर चेअरमन पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चेअरमन पदावर संधी मिळावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तावरे आडनावाची परंपरा खंडित करत केशवराव जगताप यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे.




