बारामती, (प्रतिनिधी) – माळेगाव सहकारी साखर कारखान्यात कोणाची मुल कामाला घेतली, तुम्हाला माहिती आहे? लवकरच कारखान्याच्या निवडणुका आहेत. आता आपण परत एकदा कारखाना आपल्याकडे घेतला पाहिजे. जेव्हा ते होईल तेव्हा आपण आपल्या मुलांना त्या ठिकाणी संधी देऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. युगेंद्र पवार यांच्या स्वाभिमानी यात्रा सुरू आहे. युगेंद्र पवार हे स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. युगेंद्र पवार यांनी माळेगाव कारखाना शिवनगर या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना त्यांनी वरील विधान केले. ते म्हणाले की, कारखाना, जिल्हा परिषद, दूध संघ, ग्रामपंचायत अशा अनेक संस्था यापूर्वी शरद पवारांकडे होत्या. त्या परत एकदा आपल्याला घ्याव्या लागतील व शरद पवारांकडे त्या संस्था आपल्याला द्याव्या लागतील आणि मग त्या ठिकाणी आपण आपल्या मुला-मुलींना त्या ठिकाणी संधी देऊ शकतो. नवीन चेहर्यांना स्वच्छ प्रतिमेचा चेहर्यांना आपण त्या ठिकाणी संधी देऊ शकतो, असे युगेंद्र पवार म्हणाले.