मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? मिस्ट्रीमॅन सोबतच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासोबत राहुल विजयनेही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती स्टेजवर थिरकताना दिसली.
स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील मलायकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एपी ढिल्लोन मलायकाचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन येतो. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की, ‘पहले प्यार दी पहली कहानी’ वीथ यू या त्याच्या गाण्यातील एक ओळ लिहिली आहे.
View this post on Instagram
मलायकानेही राहुल विजयसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिने ‘With You’ हे गाणे जोडले होते. मलायकासोबतचे फोटो स्टायलिस्ट राहुलनेही आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न मलायकाच्या चाहत्यांना पडला आहे. याआधीही मलायका अरोरा राहुल विजय एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्याने तो सिंगल असल्याचा खुलासा केला होता. मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 2018 साली अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाला पुन्हा प्रेमात पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.





