Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराला गंभीर दुखापत; ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…..

Malaika Arora – अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे अधिक करून ओळखली जाते. मलायका अरोराने नुकताच तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. याशिवाय ती अनेकदा तिच्या लूक आणि फिगरमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री अनेकदा जिम लूकमध्ये दिसली आहे. अलीकडेच मलायका (Malaika Arora) एका सलूनबाहेर दिसली आणि तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. मलायका सलूनच्या बाहेर काळ्या रंगाच्या टी-शर्टसह ग्रे प्रिंटेड शॉर्ट्स परिधान करून दिसली.
View this post on Instagram
यावेळी तिने फिकट गुलाबी चप्पल आणि काळा गॉगल घातला होता. पण सगळ्यांचे लक्ष मलायकाच्या पायाकडे गेले. अभिनेत्रीच्या उजव्या पायाच्या वरच्या बाजूला एक मोठा काळा डाग (जखम) दिसला, जो भाजल्यासारखा दिसत होता.
मलायका अरोराच्या (Malaika Arora) पायावर एवढी मोठी खूण पाहून काही चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली, तर काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. सध्या मलायकाचा हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी यावर कमेंट करत आहेत.





