Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! सिया गोयलचा धक्कादायक खुलासा
Siya Goyal : याच चौकशी दरम्यान सियाने धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Siya Goyal : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात दररोज नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत असल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयत केतन अग्रवालची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस दोघांची कसून चौकशी करत आहेत. याच चौकशी दरम्यान सियाने धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
पोलीस कोठडीत असलेली सिया गोयल चौकशीदरम्यान म्हणाली, “मी केतनला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाही. माझे चेतनसोबत प्रेमसंबंध आहेत आणि मला त्याच्यासोबत पळून जायचं आहे.” या खुलासामुळे केतनला चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध होते याविषयीची कल्पना होती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सियाने पुढे असा आरोपही केला की, हे सर्व सांगितल्यानंतरही केतनने लग्न मोडण्यास नकार दिला होता. “आता हे लग्न मोडू शकत नाही. माझं कुटुंब खूप श्रीमंत आहे. तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू,” असे केतनने सांगितल्याचा दावा तिने चौकशीत केला आहे.
या खुलाशानंतर या प्रकरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा खून अचानक किंवा रागाच्या भरात झालेला नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दृष्टीने तपास यंत्रणा विविध पुरावे आणि आरोपींच्या जबाबांची पडताळणी करत आहे.
हेही वाचा : Stock Market: मोहरमनिमित्त आज शेअर बाजारात ट्रेडिंग होणार का? ; येत्या तीन दिवस बंद राहणार?
दरम्यान, सियाच्या दाव्यांनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर तिला हे लग्न मान्य नव्हते, तर तिने लग्नापूर्वी किंवा साखरपुड्यापूर्वी स्पष्ट भूमिका का घेतली नाही? तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव होता का? या सर्व मुद्द्यांच्या दृष्टीनेही तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सियाचे आणि चेतन चौधरीचे प्रेमसंबंध तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. तसेच, दोघांना अमली पदार्थ आणि मद्यपानाचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सियाचे लग्न लवकरात लवकर लावून देण्याचा प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या सर्व दाव्यांची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही. या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सियाने केलेल्या दाव्यांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.






