Ayodhya Ram Mandir Chori Case : राम मंदिर ट्रस्टच्या प्रशासनात मोठे फेरबदल !
राम मंदिर देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने सोमवारी बैठक घेत प्रशासनात मोठे फेरबदल केले आहे. या बैठकीत कृष्ण मोहन यांच्याकडे राममंदिर ट्रस्टचे अंतरिम सरचिटणीस म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली.

Ayodhya Ram Mandir Chori Case – राम मंदिर देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने सोमवारी बैठक घेत प्रशासनात मोठे फेरबदल केले आहे. या बैठकीत कृष्ण मोहन यांच्याकडे राममंदिर ट्रस्टचे अंतरिम सरचिटणीस म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली.
तसेच सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले, अशी माहिती कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी दिली. याशिवाय नवीन विश्वस्ताच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी ट्रस्टची २२ जून रोजी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची सोमवारी दुपारी तीन वाजता रामजन्मभूमी संकुलातील विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्यासह नऊ स्थायी सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित होते.
स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले, या प्रकारामुळे आम्ही सर्वजण दुःखी आणि व्यथित झालो आहोत. चोरी लहान आहे की मोठी, हा दुय्यम मुद्दा आहे; येथे असे वातावरण निर्माण होऊ दिले गेले, या मुख्य गोष्टीचे आम्हांला दुःख आहे.
परंतु, सत्य आपल्यासमोर आहे आणि त्यावर चिंतन करणे आमचे कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता, एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली, सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे सादर केले. ते मंजुर करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.





