Political News : कॅबिनेट मंत्र्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
Political News : झारखंडच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखाद बातमी समोर आली आहे.

Political News : झारखंडच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) ज्येष्ठ नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. (Political News)
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे झारखंडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, JMM कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. (Political News)
मध्यरात्री अचानक प्रकृती खालावली
शनिवारी रात्री उशिरा गिरिडीह येथील राहत्या घरी सुदिव्य कुमार सोनू यांची अचानक प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. (Political News)
त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना रांचीला हलवण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच गिरिडीह प्रशासनातील अधिकारी, JMM कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक रुग्णालयात दाखल झाले. (Political News)
दोन वेळा आमदार, हेमंत सोरेन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
सुदिव्य कुमार सोनू हे गिरिडीह विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा गिरिडीह मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर २०२४ मध्येही त्यांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. (Political News)
हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पर्यटन, कला-संस्कृती, क्रीडा आणि युवा व्यवहार यांसोबतच नगरविकास तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. (Political News)
कल्पना सोरेन यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना गांडे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून देण्यात सुदिव्य कुमार सोनू यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. (Political News)
तसेच JPSC आणि CGL परीक्षांच्या निकालातील कथित गैरप्रकारांविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Political News)
झारखंडच्या राजकीय वर्तुळात हळहळ
सुदिव्य कुमार सोनू यांच्या अचानक निधनाने JMM कार्यकर्ते आणि समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे झारखंडच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, त्यांच्या समर्थकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. (Political News)
Political News : राजकीय वर्तुळात उडाली खळबळ ! ‘या’ माजी आमदारासह 11 जणांना जन्मठेप





