Shiv Sena Leader : मोठी बातमी..! शिवसेनेच्या बड्या नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ
Shiv Sena Leader : बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Shiv Sena Leader : बीड तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Shiv Sena Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या चार महिन्यांपूर्वी शिवाजीराव शिंदे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते बचावले होते. त्यानंतर आता त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Shiv Sena Leader)
शिवाजीराव शिंदे हे शिवसेनेमध्ये तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मात्र, त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिस तपासातूनच या घटनेमागील परिस्थिती स्पष्ट होणार आहे. (Shiv Sena Leader)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Shiv Sena Leader)
दरम्यान, शिवाजीराव शिंदे यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर दादाहरी वडगाव परिसरातील नागरिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. (Shiv Sena Leader)
पोलिसांच्या तपासानंतरच त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena Leader)
Maharashtra Politics : गणेश विसर्जनाच्या धामधुमीत मोठी राजकीय घडामोड! मुंबईत नेमकं काय घडलं?





