Maharashtra Politics : राजधानी दिल्लीत मोठी घडामोड! सुप्रिया सुळे-विनोद तावडे यांचा एकाच गाडीतून प्रवास; ती बैठक सुरू असताना….
Maharashtra Politics : आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Supriya Sule Vinod Tawde Meet : सध्या राज्याच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच आता एकत्र प्रवासमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा एकत्र विमान प्रवासाची बरीच चर्चा झाली होती.
आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असून, केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद आणि राज्यातील अर्थमंत्री जयंत पाटील यांना मिळू शकते अशी चर्चा आहे. अशातच सुळे आणि तावडे यांचा एकत्र एकाच वाहनातून केलेल्या प्रवासाला विशेष महत्व प्राप्त होते.
अन् सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठकीतून…
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये जलजीवन मिशनची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते उपस्थित होते. त्यानंतर ते ही बैठक सुरू असतानाच बैठकीतून बाहेर पडले आणि एकाच गाडीमधून रवाना झाले.
खासदार डॅा. अमोल कोल्हे काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील इतर खासदारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या भेटी केवळ महाराष्ट्रातील विविध समस्यांसंदर्भात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तसेच घडत असलेल्या घडमोडींमुळे आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जलजीवन मिशनच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांची नाराजी?
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे केवळ एका बैठकीला जात होते, त्यात राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जलजीवन मिशनच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.





