Political News : राजकीय भूकंप..! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, देशात खळबळ
Political News : राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Political News : बांगलादेशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Political News)
संविधानातील कलम ५०(३) नुसार राष्ट्रपतींनी आपला राजीनामा संसदेच्या सभापतींकडे सादर केला. अधिकृतरीत्या त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामागे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संपर्क साधल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. (Political News)
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात लंडन दौऱ्यावर असताना मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात राजकीय दबाव वाढल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही काही दिवसांपासून होत होती. (Political News)
दरम्यान, बांगलादेशातील द डेली स्टारच्या वृत्तानुसार, सुरुवातीला शहाबुद्दीन यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र वाढत्या दबावानंतर त्यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला. (Political News)
संसदेचे अध्यक्ष हाफिजउद्दीन अहमद यांनी राष्ट्रपतींचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली आहे. या घडामोडीनंतर बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. (Political News)

Political News : राजकीय भूकंप..! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, देशात खळबळ
दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात असून, त्या सप्टेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याबाबत वक्तव्य केल्याचेही वृत्त आहे. मात्र, त्यांच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. (Political News)
Political News : दिल्लीत महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांना अटक; राजकीय वातावरण तापलं
Political News : ‘या’ राज्यातील सरकार कोसळणार? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

