Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी.! अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, CM फडणवीस काय म्हणाले? वाचा….
सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या पण तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. योजनेच्या छाननी प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.
तब्बल ८० लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा करत सरकारच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट करत लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिला आहे. (Ladki Bahin Yojana)
योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी आणि छाननी सुरू असताना अनेक अर्जांमध्ये नियमांनुसार त्रुटी आढळून आल्या.
काही महिला उत्पन्न, वय किंवा इतर पात्रता निकषांमध्ये बसत नसल्याचे समोर आले, तर काही अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अपात्र ठरले. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना यापूर्वी मिळालेल्या हप्त्यांची रक्कम सरकार परत घेणार का? अशी चर्चा राज्यभर सुरू झाली होती. (Ladki Bahin Yojana)
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, ‘ज्या महिलांना योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे आणि नंतर त्या अपात्र आढळल्या, त्यांच्याकडून सरकार कोणत्याही प्रकारची रक्कम परत वसूल करणार नाही. त्यामुळे लाखो महिलांमध्ये निर्माण झालेली भीती आणि संभ्रम दूर झाला आहे’. (Ladki Bahin Yojana)
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. ज्या महिलांचे अर्ज किरकोळ त्रुटी, चुकीची माहिती किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडल्यामुळे अपात्र ठरले आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)
सरकार लवकरच KYC (Know Your Customer) प्रक्रिया पुन्हा सुरू करणार असून त्यासाठी विशेष विंडो खुली करण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित महिलांना आवश्यक कागदपत्रे सादर करून किंवा त्रुटी दुरुस्त करून आपली पात्रता सिद्ध करता येणार आहे. (Ladki Bahin Yojana)
सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या पण तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच लाभार्थी महिलांकडून आधी मिळालेली रक्कम परत घेतली जाणार नसल्याने राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.






