पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘काशी व्हेंचर’ कंपनीवर छापा; तब्बल 15 कोटींचा गुटखा ‘जप्त’

Updated On:

पुणे – गुटख्यापासून कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आजारग्रस्त व्यक्तींचे कुटुंबातील लोकांना मोठया प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गुटख्यावर बंदी असूनही त्याची विक्री होत असल्याने पुणे पोलीसांनी गुटखा विरोधी मोहीम सुरुवात करत मागील दोन महिन्यात आतापर्यंत 28 ठिकाणी छापे टाकून मोठया प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला आहे.

सदर गुन्हयातील आरोपींचे चौकशी दरम्यान गुजरात राज्यात वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्वासा “गोवा’ या नावाने प्रतिबंधित गुटखा उत्पादन केले जात असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार पुणे पोलीसांचे युनिट चारचे पथकाने सिल्वासा येथे काशी व्हेंचर्स या कंपनीवर छापा टाकून 15 कोटींचा गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याप्रकरणात गोवा गुटखाचे मालक आणि गुटखाकिंग जे.एम.जोशी यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

शहरातील गुटखा रॅकेटवर छापामारी सुरु करताना पोलीसांनी सुरुवातीला चंदननगर हद्दीत 17 नोव्हेंबर रोजी सुरेश अग्रवाल, अक्षय अग्रवाल, आकाश अग्रवाल, प्रविण वाहुळ, निरज सिंगल यांचेवर गुन्हा दाखल करुन सात लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आणि वाहने जप्त केली. या गुन्हयाचा तपास युनिट चारचे पथकाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल करत असताना, तपासात प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे पोलीसांनी हवालाद्वारे व्यवहार करुन देणाऱ्या पाच ठिकाणांवर छापे टाकून सुमारे चार कोटी रुपये इतकी रक्कम जप्त केली. दोन जानेवारी रोजी पोलीसांनी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकुन 25 लाख रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त केली.

याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर, चौकशी दरम्यान अवैध गुटख्याचे उत्पादन व वितरण हे वापी (गुजरात) व सिल्वहासा (दादर नगरहवेली) येथे अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाली. तेथून माल घेऊन त्याचा मोठया प्रमाणावर पुरवठा चोरटया मार्गाने अटक आरोपींच्या मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शितल शिंदे यांच्या पथकाने वापी आणि सिल्वहासाला छापे टाकले.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : करमोळीत पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा

2026-04-02 19:05:28

Pune News : करमोळीत पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय

2026-04-02 19:04:35

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय

Pune Unseasonal Rains: पुण्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी; झाड कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

2026-04-02 18:51:38

Pune Unseasonal Rains: पुण्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी; झाड कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

Unseasonal Rains: पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर

2026-04-02 18:07:23

Unseasonal Rains: पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर

Ashok Kharat : अशोक खरात 'या' महिला नेत्याच्या बहिणीच्या बँक खात्याचा नॉमिनी? नवा कारनामा समोर

2026-04-02 16:35:56

Ashok Kharat : अशोक खरात 'या' महिला नेत्याच्या बहिणीच्या बँक खात्याचा नॉमिनी? नवा कारनामा समोर