Accident News : उत्तर प्रदेशात एक भीषण अपघात घडला असून, पोलिसांच्या पथकातील चार कर्मचाऱ्यांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात शोककळा पसरली आहे. (Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, जालौन येथून हरियाणातील नूंहमध्ये अपहरण प्रकरणात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाचा परतीच्या प्रवासात अपघात झाला. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक मोहित यादव, सत्यभान यांच्यासह दोन शिपाई आणि एका तक्रारदाराचा मृत्यू झाला. (Accident News) प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाहन वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि भीषण अपघात झाला. धडकेनंतर कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून, त्यातील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. (Accident News) Accident News : मोठा अपघात..! ४ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जणांचा दुर्दैवी अंत; पोलिस दलात शोककळा अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. (Accident News) जोल्हुपूरजवळ सहा जणांचा मृत्यू (Accident News) दरम्यान, उत्तर प्रदेशातील जालौन-झांसी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला. कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोल्हुपूरजवळ भरधाव कार ट्रकच्या मागे घुसल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. (Accident News) कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातात 4 जणांचा मृत्यू कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे वळणावर आज सकाळी काळाने भीषण झडप घातली. विठ्ठलवाडी आगाराची एसटी बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News) मृतांमध्ये स्कॉर्पिओमधील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सलग अपघातांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Accident News)