IND vs SL : महिश तीक्ष्णाची कमाल! आपल्याच गोलंदाजीवर हवेत झेप घेत पकडला गिलचा अप्रतिम कॅच, पाहा VIDEO

शुबमन गिलचा खराब फॉर्म कायम
शुबमन गिलचा आशिया कपमधील खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर गिलने प्रथम एक चौकार ठोकला, परंतु त्यानंतर त्याने चुकीचा फटका खेळला, जो गोलंदाजाच्या दिशेला गेला. त्यामुळे तीक्ष्णाने डाव्या बाजूला हवेत झेप घेत हा अप्रतिम झेल टिपला. गिल अवघ्या 4 धावांवर बाद झाला.
Theekshana caught the big fish,
What a catch, shubman gill goes for 4
India 15-1$SIXR @SIXR_cricket #INDvsSL #SLvsIND pic.twitter.com/95k7XD9Pro— AAD 🪧 DEGEN (@aad2degen) September 26, 2025
या स्पर्धेतील गिलची सर्वोच्च धावसंख्या 47 धावा आहे, जी त्याने सुपर 4 मध्ये पाकिस्तानविरुद्ध केली होती. गिल यंदाच्या आशिया कपमधील पुनरागमनानंतर अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. यापूर्वी त्याने तीन मालिका गमावल्या होत्या, परंतु त्याच्या पुनरागमनाचा फारसा प्रभाव पडलेला नाही.
हेही वाचा – IND vs SL : अभिषेक शर्माचा मोठा धमाका! एकाच झटक्यात विराट-रोहितच्या ‘या’ खास विक्रमांची केली बरोबरी
महिश तीक्ष्णाचा अविश्वसनीय झेल –
महिश तीक्ष्णाने घेतलेला हा झेल खरोखरच अविश्वसनीय होता. त्याने डाव्या बाजूला झेप घेत हवेतच चेंडू अचूकपणे टिपला. हा झेल इतका अप्रतिम होता की, शुबमन गिललाही आश्चर्याचा धक्का बसला. श्रीलंकेला या झेलमुळे सामन्यात पहिली विकेट मिळाली. दरम्यान, भारताने यापूर्वीच अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे, तर श्रीलंका संघ या स्पर्धेत बाहेर पडला आहे.
हेही वाचा – ISSF Junior World Cup : भारताच्या युवा नेमबाजांची कमाल! जोनाथनने सुवर्णपदक तर रश्मिकाने पटकावलं रौप्यपदक
श्रीलंकेसमोर 203 धावांचे लक्ष्य –
प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्माच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांत पाच गडी गमावून 202 धावा केल्या. विशेष म्हणजे, आशिया कपच्या चालू आवृत्तीत ही पहिलाच 200 पेक्षा जास्त धावसंख्या आहे. टी-20 आशिया कपच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रीलंकेकडून महिश तीक्ष्णा, दुष्मंथा चामीरा, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका आणि चरिथ असलंका यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





