Mumbai News : ‘महायुती’चा १०० दिवसांचा निकाल जाहीर, फडणवीसांपेक्षा अजित पवारच ठरले सरस…! कोणी मारली बाजी? वाचा संपूर्ण यादी…

Mahayuti Government : मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शंभर दिवसांचा आढावा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीच्या वतीने प्रत्येक विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता.
दरम्यान, पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आदिती तटकरेंकडे असलेला महिला व बालविकास आघाडीवर आहे. तर सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपचे तीन विभाग टाॅप पाचमध्ये आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे विभाग पुढीलप्रमाणे..
– ५ मंत्रालयीन विभागांचे सचिव,
– ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
– ५ जिल्हाधिकारी,
– ५ पोलिस अधीक्षक,
– ५ मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
– ४ महापालिका आयुक्त,
– ३ पोलिस आयुक्त,
– २ विभागीय आयुक्त आणि
– पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.
भाजपचे दोन मंत्री गुणवत्ता यादीत
पहिल्या पाच जणांमध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये जयकुमार गोरे यांचा ग्रामविकास विभाग ६३.८५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, पाचव्या स्थानावर नितेश राणे यांचा बंदरे विभाग आहे. यासोबत प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग देखील ६१.२८ गुणांसह नितेश राणेंच्या विभागासह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.
क्रमांक कार्यालयाचे नाव गुण (१०० पैकी)
महिला व बाल विकास विभाग ८०
सार्वजनिक बांधकाम विभाग ७७.९५
कृषी विभाग ६६.१५
ग्राम विकास विभाग ६३.८५
पहिवहन व बंदरे विभाग ६१.२८
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम
चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना १०० पैकी ८४.२९ टक्के गुण
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ८१.१४ टक्के गुणांसह द्वितीय
जळगावचे जिल्हाधिकारी ८०.८६ टक्के गुणांसह तृतीय स्थानी
अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे ७८.८६ टक्के गुण
नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर,६६.८६ टक्के गुण
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर… pic.twitter.com/svAqMiLPok
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025





