महात्मा फुले वाड्याच्या कामात टोलवाटोलवी; भुजबळांचा उपोषणाचा इशारा, फुले सिनेमाबद्दल म्हणाले…

Chhagan Bhujbal | समता परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महात्मा फुले वाड्याच्या जमीन अधिग्रहणाबाबत त्यांनी पालिका अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचे सांगितले. तसचे मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या तर थोडीशी अडचणी होते असे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महात्मा फुले वाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे. तेव्हा आणि त्यापूर्वीपासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. हे १०० ते २०० कोटींचे काम आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून देखील प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नसल्याची खंत भुजबळांनी व्यक्त केली.
तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासाठी सकारात्मक आहेत. सरकारमध्ये असताना देखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलन का करावं लागतं असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, या गोष्टी सरकारला विचारायला हवं या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री यांना विचारायला हवा की या गोष्टीसाठी आंदोलन का? करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
सिनेमाला विरोध करू नये
अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा हे फुले या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रतिक महात्मा फुले यांच्या भूमिकेत आहे, तर पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून फुले दाम्पत्यांच्या संघर्षमय इतिहास पाहायला मिळणार आहे. यावर देखील भुजबळ यांनी भाष्य केले. चित्रपटाला सेसॉरने देखील परवानगी दिली आहे. हे खरं आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणाने काही गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे इतिहास हा इतिहास म्हणून समोर आला पाहिजे, असे ते म्हणाले. फुले यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो आहे. याचा मला आनंद आहे. त्यामुळे मला वाटतं कोणीही विरोध करू नये, असे देखील छगन भुजबळ यांनी सांगितले.





