“महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी” – शिवकुमार डोंगरे

जामखेड : बारावे शतक हे खर्या अर्थाने क्रांतियुग म्हटले पाहिजे. या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारखा क्रांतिकारक समाजसुधारक उदयास आला. मध्य युगाच्या बाराव्या-तेराव्या शतकात धर्मसुधारणेच्या माध्यमातुन विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ऊतरवणारे महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन शिवा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी केले.
महात्मा बसवेश्वरांच्या ८८८ वी जयंती शहरातील तहसील कार्यालय,नगरपरिषद कार्यलय व कोर्ट रोड येथे साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश माळी, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, आकाश बाफना यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या कार्याविषयी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी महेश नगरे शिवा संघटना अध्यक्ष जगदीश मेंनकुदळे , अनिल लोखंडे, अनिल लोहकरे , राहुल लोहकरे, सुनील ओझर्डे, अमोल लोहकरे, अमरनाथ डोंगरे, बजरंग सरडे, आंनद लोहकरे, अशोक डोंगरे, विठ्ठल परांडकर ,अमृत डोंगरे, नय्युमभाई सुभेदार, महेश कस्तुरे ,विजय डोंगरे, गणेश गवसणे व समाज बांधव व इतर बांधव उपस्थित होते.
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या मागणी नुसार व शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय कार्यालये, नीम शासकीय कार्यालये, विविध शासकीय महामंडळे आदि ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येवु लागली.
त्याच अनुषंगाने जामखेडमध्येही शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून लेखी निवेदने देउन जयंती साजरी करण्या बाबत विनंती केली होती त्याला शासकिय अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिला.





