फिल्टरपाड्याचा गौरव आता हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवणार, सिनेमाचे पोस्टर आले समोर

Gaurav More New Hindi Movie: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता गौरव मोरे लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. गौरवने आतापर्यंत मराठी मालिका, नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता अभिनेता मोठ्या पडद्यावर हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे. गौरव मोरेने त्याचा आगामी हिंदी चित्रपट ‘संगी’चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
नवीन वर्षाची सुरुवात नव्या कामाने करतोय आशीर्वाद असू द्या, असे म्हणत त्याने आपल्या आगामी हिंदी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. आतापर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
View this post on Instagram
हिंदी मालिका ‘मॅडनेस मचांएगें, इंडिया को हसाएंगें’ यातही तो झळकला होता. ‘बॉईज 4’, ‘लंडन मिसळ’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली आहे.
गौरव मोरेची भूमिका असलेला ‘संगी’ हा हिंदी चित्रपट 17 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले आहे. तर रोहन भोसले, अरूण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात गौरवसोबतच शारिब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.





