Viraj Jagtap : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अनेकांचा आवडत्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील एका अभिनेत्याचा अपघात झाल्याचे बातमी समोर आली आहे. बदलापूर भागातील आदर्श मंदिराजवळ 24 मार्चला अपघाताची घटना घटली असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे अभिनेत्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या अभिनेत्याचे नाव आहे विराज जगताप. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहचला. त्याचे अनेक चाहते आहेत. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. नेमकं घडलं काय? मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता विराज जगताप 24 मार्च रोजी आपल्या मित्राकडे गेला होता. कौटुंबिक कार्यक्रमाहून रात्री घरी परतत असताना त्याला गतीरोधकाचा अंदाज आला नाही. गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने विराजचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी घसरली. त्याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या मनगटावर शस्त्रक्रिया केली. दरम्यान, चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नसून त्याची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांचा संताप शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्पीड ब्रेकर ठरावीक मापात असणे आणि त्यावर रात्री स्पष्ट दिसण्यासाठी चिन्हे लावणे आवश्यक असते. पण बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी हे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे नागरिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभावर संताप व्यक्त करत आहेत. हेही वाचा : Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी? ‘या’ नावांची होतेयं चर्चा