स्वप्नपूर्ती ! गौरव मोरेने अखेर खरेदी केली आलिशान कार

Gaurav More | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरेला एक वेगळी ओळख मिळाली. हास्यजत्रेमुळे गौरवचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. नुकतेच गौरवने आलिशान कार खरेदी केली आहे. या आनंददायी क्षणाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गौरवने नवीन गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत यावर “फायनली नवीन गाडी घेतली” असं कॅप्शन दिले आहे. अभिनेत्याने खरेदी केलेल्या ‘Skoda Kylaq’ गाडीची किंमत ७.९ लाख ते १४.४ लाख असल्याचे म्हंटले जात आहे. त्याच्या पोस्टनंतर चाहत्यांसह कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
गौरव मोरेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मुंबईतील पवई येथील फिल्टर पाडा या झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेल्या गौरवने आपल्या मेहनतीने मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आजही तो आपल्या मूळ ठिकाणी राहतो, कारण त्याला त्या ठिकाणाशी असलेली नाळ जपायची आहे. त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून देखील ओळखलं जातं.
त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. शो सोडल्यावर त्याने ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये काम केलं होतं. याशिवाय गौरव येत्या काळात अनेक मराठी सिनेमांमध्ये झळकणार आहे. सध्या त्याचा जयभीम पँथर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. Gaurav More |
हेही वाचा:
Pune Gramin : सौर पंप एजन्सींकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; शिरूर तालुक्यात मोठा भ्रष्टाचार





