gaurav more: ताडपत्रीच्या घरापासून पवईत हक्काचा फ्लॅट : गौरव मोरेला मिळाला म्हाडाच्या नव्या घराचा ताबा

gaurav more: विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गौरव मोरे अखेर स्वतःच्या घराचा मालक झाला आहे. म्हाडाच्या लॉटरीत त्याला पवईत घर मिळालं होतं. २५ सप्टेंबर रोजी गौरवने आपल्या कुटुंबासह या नव्या घराचा ताबा घेतला.
गौरवचं बालपण ताडपत्रीच्या घरात गेलं. लहानपणापासून “जिथे राहतो तिथेच हक्काचं घर असावं” हे त्याचं स्वप्न होतं. आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावर आनंद शेअर करताना तो भावूक होत म्हणाला,
“फिल्टरपाडा ते पवई हा प्रवास छोटा वाटतो, पण तो पार करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागली. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटलं की आपण खरंच काहीतरी साध्य केलं. माझी नाळ कायम फिल्टरपाडा आणि पवईशी जोडलेली आहे, ती कधीच तुटणार नाही. म्हाडाचे मनापासून आभार.”
View this post on Instagram
मुंबईसारख्या शहरात घर मिळणं सोपं नाही. लाखो अर्जदारांमध्ये गौरव मोरे आणि शिव ठाकरे या दोघांना २०२४ च्या म्हाडा लॉटरीत घरं मिळाली होती. अखेर गौरवला त्याचं हक्काचं स्वप्नवत घर मिळालं आहे.
गौरवच्या या भावनिक पोस्टवर मराठीतील अनेक कलाकार, ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, प्रथमेश परब, अभिजीत खांडकेकर, निमिष कुलकर्णी, क्षितिज पटवर्धन यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आता चाहत्यांना त्याच्या नव्या घराची झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे.





