Maharashtra Weather Update : गायब झालेला पाऊस पुन्हा एन्ट्री करणार; काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली असली तरी काही जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. बहुतांश भागात कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने 14 राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे.
या सर्व राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये प्रति तास ८० ते ८५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली असली तरी देखील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. आज राज्यात पुन्हा पाऊस जोर पकडू शकतो. मराठवडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर धुळे, नंदुरबार, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल. राज्यात आज पावसाची उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पावसाची अचानक विश्रांती
गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार बरसलेल्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून अचानक विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस घाट परिसरातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती.
मात्र,गेल्या 48 तासांत या भागातील बहुतांश भागांत पावसाची नोंद थेट शून्यावर आली आहे. हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:






