Weather Forecast : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका कायम; कोकणात उष्ण व दमट हवेचा ‘यलो अलर्ट
Weather Forecast : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून, एकीकडे ‘ऑक्टोबर हीट’चा तीव्र चटका आणि प्रचंड दमट वातावरणामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.

Weather Forecast : राज्यातील हवामानात सध्या बदल होत असून, एकीकडे उष्णतेचा चटका आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast)
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागांत ढगाळ वातावरणासोबतच उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. (Weather Forecast)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो. (Weather Forecast)




