Weather Forecast : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा! पुणे घाटमाथ्यावर यलो अलर्ट; ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार
Weather Forecast : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवीन अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सूनचा जोर पुन्हा वाढला आहे.

Weather Forecast : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Weather Forecast)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून, कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Forecast)
याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Forecast)
दरम्यान, हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, ६ ऑगस्टपासून राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता असून त्यानंतर बहुतांश भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. (Weather Forecast)
मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे जून महिन्यात निर्माण झालेली पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप पिकांच्या वाढीसही मदत होणार आहे. (Weather Forecast)
Weather Update: राज्यात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन






