Water Shortage : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. (Water Shortage) अहवालनुसार राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांमध्ये एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरमध्ये ३३ शासकीय तर ६६९ खासगी टँकरचा समावेश आहे. (Water Shortage) वाढत्या तापमानामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडू लागल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकर हा नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार ठरत आहे. ठाणे विभागात सर्वाधिक १७७ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. (Water Shortage) तर नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (Water Shortage) छत्रपती संभाजीनगर विभागात १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी एकूण २४४ टँकर कार्यरत असून राज्यातील सर्वाधिक टँकर या विभागात वापरण्यात येत आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सध्या कोणत्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही. (Water Shortage) राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून टँकर पुरवठ्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा वापर, विहिरींचे अधिग्रहण आणि जलसाठ्यांचे नियोजन यावरही भर दिला जात आहे. (Water Shortage)