Women’s T20 Tournament : महाराष्ट्राचा संघ जाहीर, कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे कर्णधारपद…
Updated On:

Women’s T20 Tournament :- बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महिला टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
गुरुवारपासून स्पर्धेला प्रारंभ होणार असून महाराष्ट्राची पहिली लढत पॉण्डिचेरी संघाबरोबर असणार आहे. या स्पर्धेत छत्तीसगड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, विदर्भ, उत्तराखंड व कर्नाटक संघाचे आव्हान महाराष्ट्रासमोर असणार आहे.
जाहीर केलेला संघ पुढीलप्रमाणे : अनुजा पाटील (कर्णधार), तेजल हसबनीस (उपकर्णधार), किरण नवगिरे, खुशी मुल्ला, श्वेता माने, मुक्ता मगरे, श्रद्धा पोखरकर, उत्कर्षा पवार, आरती केदार, इशिता खळे, ईश्वरी सावकार, ईशा पठारे, आरती दासगुडे, तेजस्विनी बाटवाल, शिवाली शिंदे व ऋतुजा गिलबिले.





