maharashtra rain : जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली

पुणे – शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असून, पुढील काही दिवस शहरात तुरळक स्वरूपात पाऊस पडणार असल्याचा
अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभगाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी तीव्रतेचे वादळाची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.
तर गुजरात किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्ट्याची तीव्रता देखील कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर ओसरणार असल्याने, पुण्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवडा भरापासून जिल्ह्यातील वेल्हे, भोर, मावळ, मुळशी तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला.
त्याच वेळी बारामती, पुरंदर, सासवड, शिरुर, इंदापूर या भागातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे 1 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान सरासरी 772.1 मिलिमीटर पाऊस पडतो.
यंदाच्या पावसाळ्यात या दरम्यान 836.4 मिलिमीटर पावसाची प्रत्यक्ष नोंद झाली. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत 8 टक्के जास्त पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.




